मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 06 August 2026 वेळ: 4:51 PM
पुणे

पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव बल्करची मोटारसायकलला धडक; 76 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी

06 August 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

प्रतिनिधी:

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मदनवाडी परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या बल्करने मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 76 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 2 ऑगस्ट) सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित बल्कर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र ऊर्फ बापू विठ्ठल निकम (वय 76) हे आपल्या शेतातून MH-42 N-8362 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून मदनवाडी येथील पद्मावती मच्छीखानावळ समोरील पुणे–सोलापूर महामार्गाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या MH-25 AK-5566 क्रमांकाच्या बल्करने त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.

 

धडक इतकी भीषण होती की रामचंद्र निकम हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याचे हाड मोडले असून बरगडी व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ते बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले होते.

 

घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने त्यांना मदनवाडी येथील मेडीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना तेथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

या अपघातात मोटारसायकलीचेही मोठे नुकसान झाले आहे. तक्रारीनुसार, बल्कर चालक विजय लक्ष्मण डोंगरे (वय 23, रा. पागरदरवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal