मळद गावातील वस्तीगृहात रमी गेमचा सुळसुळाट?; शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असूनही कारवाईचा प्रश्न
मळद, प्रतिनिधी
मळद गावातील एका वस्तीगृहात रमी गेमचा वावर वाढल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू असून, हा भाग शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असतानाही संबंधित प्रकारावर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वस्तीगृह परिसरात रात्रीच्या वेळी रमी गेम खेळला जात असल्याची चर्चा असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होण्याची शक्यता असल्याने पालकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
संबंधित परिसर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. “जर अशा प्रकारच्या हालचाली सुरू असतील तर त्यावर कारवाई का होत नाही?” असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
