मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 25 August 2026 वेळ: 6:47 AM
Uncategorized

रम्मी अड्ड्याला कोणाचे अभय? मळदमधील प्रकारामुळे नागरिक संतप्त

25 August 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

बारामती, प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील मळद परिसरातील एका वस्तीगृहात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम रम्मीचा डाव सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुपारी सुमारे १ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज ठराविक वेळेत या ठिकाणी अनेक जण एकत्र येऊन पैशांचा रम्मीचा डाव खेळत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्याचेही सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही.

विशेष म्हणजे, पोलीस वाहन अथवा पोलीस कर्मचारी परिसरात आल्याची चाहूल लागताच संबंधित व्यक्ती काही क्षणांत पसार होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी कोणताही पुरावा हाती लागत नसल्याची चर्चा आहे. मात्र हा प्रकार सातत्याने सुरू असल्याने नेमके यामागे कोणाचे संरक्षण आहे का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

परिसरातील काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा असून त्यामुळे अनेक तरुण जुगाराच्या आहारी जात आहेत. अशा प्रकारांमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित ठिकाणी कोणती चौकशी करण्यात आली आहे का, तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का, तसेच कारवाई का झालेली नाही, याबाबत नागरिकांना उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे मळद परिसरातील या कथित रम्मी अड्ड्यावर पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचीही मागणी होत आहे.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal