मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 26 August 2026 वेळ: 3:06 PM
पुणे

माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

26 August 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

माळेगाव, |प्रतिनिधी. 

माळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई करत ₹4 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कऱ्हावागज चौक परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित मोटारसायकल व त्यानंतर आलेल्या अल्टो कारवर लक्ष ठेवण्यात आले. व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची ओळख शेखर श्रीरंग पवार (रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व कैलास शंकर गव्हाणे (रा. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे) अशी झाली.

झडतीदरम्यान पोलिसांना 33 बॉक्स देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू असलेले दोन ड्रम, एक मारुती सुझुकी अल्टो कार आणि एक मोटारसायकल असा एकूण ₹4.46 लाखांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व माल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. तसेच आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दानेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टीही उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

माळेगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal