मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 21 September 2026 वेळ: 2:54 PM
Uncategorized

बॉक्सिंगमध्ये परिसरातील खेळाडूंची दमदार कामगिरी; गुणवंत खेळाडूंचा सन्मान

21 September 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

प्रतिनिधी | पंढरपूर कार्तिक औसेकर : जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ तसेच नाशिक ओपन बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पारितोषिक प्राप्त करणाऱ्या परिसरातील गुणवंत बॉक्सिंगपटूंचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अक्षरा सोमनाथ शिरसागर यांनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. दिव्या अनंत नायकू यांनी महिला वर्गात प्रथम क्रमांक पटकावला, तर चिन्मय जगदीश डांगे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
तसेच नाशिक ओपन बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये आनंद वेताळ खंडागळे यांनी प्रथम क्रमांक मिळवत आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवली.
या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करताना त्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि चिकाटीचा गौरव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून त्याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.
या कार्यक्रमास पंढरपूर तालुका मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते प्रणव मालक परिचारक, नगरपालिका नगरसेविका सौ. मनीषाताई देशपांडे, विनायक महाराज हरिदास, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक ऋषिकेश उत्पात, ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियन नरेंद्र औसेकर सर, एन.पी. डांगे सर, माऊली सिताबराव सर, शाहू देशमुख सर, दीपक दहीहंडी सर, तसेच ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील या गुणवंत खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मातीतून घडणारे हे खेळाडू भविष्यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal