मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026
NND Live News: ई-पेपर व्ह्यू
मुख्य संपादक: सनी पटेल
ईमेल: contact@nndlivenews.in
वेबसाईट: nndlivenews.in

NND LIVE NEWS

निष्पक्ष, अचूक आणि वेगवान बातम्या

डिजिटल बातमी ई-पेपर
तारीख: 05 August 2026 वेळ: 6:21 PM
जगभर

मुसळधार पाऊस झोडपणार, या राज्यामध्ये वीज कोसळण्याचा धोका, अलर्ट जारी

05 August 2026 | प्रतिनिधी: nndlivenews@gmail.com

देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये 6 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पूर्व, ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा कहर पहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांतही पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेशात 6 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IMD च्या माहितीनुसार, अंदमान-निकोबार बेटे, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड आणि ओडिशा येथे पावसाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातही पावसाची शक्यता

पश्चिम भारतात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, सौराष्ट्र, कच्छ आणि गुजरात येथे पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि गोव्यात 6 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण भारतात काय परिस्थिती?

दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर केरळ, माहे, किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय केरळ, माहे, लक्षद्वीप, उत्तर अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि यानम या भागातही जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

© NND Live News | सर्वाधिकार सुरक्षित MIB & PIB Email Intimated Digital Portal