मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 5 August 2026

150 कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटकेत

पुणे, सायबर गुन्हेगारीविरोधातील मोठ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील आलंदी पोलिसांनी तब्बल 150 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक…

nndlivenews@gmail.com वार्ताहर
August 5, 2026 1 मिनिट वाचन 8 वाचन

पुणे, सायबर गुन्हेगारीविरोधातील मोठ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील आलंदी पोलिसांनी तब्बल 150 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून 65 हून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून “म्युल अकाउंट” चा वापर करून फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगार नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक, नोकरीची ऑफर आणि इतर आमिषे दाखवून जाळ्यात ओढत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून या रॅकेटचा अधिक तपास सुरू असून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी लिंक, गुंतवणुकीच्या ऑफर आणि संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

NND LIVE NEWS
जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास

nndlivenews@gmail.com

हे लेखक NND LIVE NEWS साठी दर्जेदार पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *