मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026

भिगवणमध्ये अवैध वेश्या व्यवसायाचा सुळसुळाट? हॉटेल आर्यनवर गंभीर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

nndlivenews@gmail.com वार्ताहर
August 24, 2026 1 मिनिट वाचन 5 वाचन

भिगवण, प्रतिनिधी : भिगवण परिसरातील हॉटेल आर्यनमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये यापूर्वी एका कामगाराचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्या घटनेनंतर काही काळासाठी हॉटेलमधील संशयास्पद हालचाली थांबल्या होत्या. मात्र, प्रकरण शांत होताच पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या मालकीचे असलेले हे हॉटेल परप्रांतीय व्यक्तींना चालवण्यासाठी देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायामुळे परिसरातील महिला, युवक आणि नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इतका गंभीर प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप होत असताना पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच या प्रकरणात संबंधितांना कोणाचे पाठबळ आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता पोलिस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे भिगवण परिसराचे लक्ष लागले आहे.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform dedicated to providing fast, accurate and reliable news from Baramati, Pune, Maharashtra and across India. Our mission is to bring truth to the people through fearless journalism, covering local news, breaking news, crime news, political updates, social issues and important events. We believe in responsible journalism, transparency and giving a voice to the common people. NND LIVE NEWS – निर्भीड पत्रकारिता, सत्याची साथ!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *