मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 24 September 2026

रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी रिक्षा; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

nndlivenews@gmail.com वार्ताहर
August 22, 2026 1 मिनिट वाचन 14 वाचन

माळेगाव प्रतिनिधी: माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत निरा-बारामती मार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेजसमोर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा धोकादायक पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संदीप भिमराव वाघमोडे हे सहकाऱ्यांसह शनिवारी (दि. २२) दुपारी नियमित पेट्रोलिंग करत होते. यावेळी निरा-बारामती रोडवरील इंजिनिअरिंग कॉलेजसमोर एमएच ४२ एआर ८५५१ क्रमांकाची काळी-पिवळी तीनचाकी रिक्षा रस्त्यावर उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर रिक्षेमुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होण्याची तसेच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

पोलिसांनी रिक्षाचालकास विचारपूस केली असता त्याने आपले नाव राहुल जगन्नाथ रणदिवे (वय ३८, रा. शारदानगर, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) असे सांगितले. वाहन रस्त्यावर उभे करण्याबाबत समाधानकारक कारण न देता सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform dedicated to providing fast, accurate and reliable news from Baramati, Pune, Maharashtra and across India. Our mission is to bring truth to the people through fearless journalism, covering local news, breaking news, crime news, political updates, social issues and important events. We believe in responsible journalism, transparency and giving a voice to the common people. NND LIVE NEWS – निर्भीड पत्रकारिता, सत्याची साथ!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *