मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 4 October 2026

शेरेवाडीतील दोन वृद्ध महिलांच्या हत्येचा उलगडा; जवळच्याच नातेवाइकावर संशय, पाच दिवसांत पोलिसांनी गाठले आरोपीपर्यंत

nndlivenews@gmail.com वार्ताहर
October 4, 2026 1 मिनिट वाचन 5 वाचन

सुपे प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथील दोन वृद्ध महिलांच्या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत उलगडा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन्ही मृत महिलांच्या जवळच्या नात्यातील लडकत आडनावाच्या व्यक्तीला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण बारामती तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले होते. सुरुवातीपासूनच पोलिसांसमोर या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. तपासादरम्यान या महिलांच्या जवळच्या नात्यातील व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती लडकत आडनावाची असून, तो मृत महिलांचा जवळचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित आरोपीला जुगार खेळण्याचे व्यसन होते. जुगारामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याच्यावर आर्थिक ताण निर्माण झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. मृत महिलांकडे मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने असल्याची माहिती त्याला होती. या पैशांच्या आणि दागिन्यांच्या चोरीच्या उद्देशातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र, हत्येमागील नेमके कारण, चोरीचा प्रयत्न झाला होता का, तसेच या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या संदर्भातील अंतिम निष्कर्ष अधिकृत तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

दोन वृद्ध महिलांच्या हत्येमुळे शेरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी विविध बाबींचा मागोवा घेतला. अखेर पाच दिवसांच्या तपासानंतर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचेही सांगण्यात येत असले, तरी याबाबत अधिकृत पोलिस निवेदनातून पुष्टी होणे आवश्यक आहे.

एकीकडे मृत महिलांच्या नात्यातीलच व्यक्ती या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आल्याने या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. तर दुसरीकडे जुगारातील आर्थिक नुकसान आणि पैशांच्या लालसेतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

शेरेवाडीतील या दुहेरी हत्याकांडातील सर्व बाबी, आरोपीविरोधातील पुरावे आणि हत्येमागील नेमके कारण पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.

nndlivenews@gmail.com

NND LIVE NEWS is a Marathi digital news platform with 3 years of journalism experience, delivering fast, accurate, and reliable news from across Maharashtra. We cover breaking news, crime, politics, social issues, and important events with a commitment to truth, transparency, and fearless journalism. NND LIVE NEWS – Fearless Journalism, Standing with the Truth!

सर्व लेख पहा

तुमची प्रतिक्रिया द्य NND LIVE NEWS

Your email address will not be published. Required fields are marked *